जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२४
राज्यात नुकतेच मुख्यमंत्रीपदी देवेद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे तर उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे व अजित पवार असून अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नसल्याने विरोधक टीकास्त्र सोडत असतांना नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी थेट तारीखच सांगितली आहे. 14 तारखेला मुंबईत मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचे जय पवार यांनी म्हटले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पोहोचले आहेत. तर अजित पवार यांच्यासह महायुतीचे काही मोठे नेते देखील दिल्लीत जाण्याची जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्यामुळे टीका होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असल्याचे स्व:त जय पवार यांनी सांगितले आहे.
अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ बारामतीमध्ये आयेाजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 14 डिसेंबर रोजी नियोजित होता. मात्र, याच दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने सत्कार कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याचे जय पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, हा सत्कार नंतर कधी होणार? या बाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. 16 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. त्यानंतरच हा सत्कार होईल.