जळगाव मिरर । २९ नोव्हेबर २०२२
राज्यात दोन वर्ष कोरोना काळात कुठलीही भरती न झाल्याने आता शिंदे सरकारने भरती करण्याची घोषणा केली होती. त्यावर आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस भरतीत इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे राज्य सरकारने अर्ज भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवली आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नुकतीच माहिती दिली आहे. या कॅबिनेट बैठकीत विविध निर्णयहि घेण्यात आले.
राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ.
आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त.
अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 29, 2022
पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवण्यात आली. दर मंत्रीमंडळ बैठकीत ७५ हजार पदाचा आढावा घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेला गती देण्यात येणार.
तसेच स्वतंत्र्य दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापनेस मंजुरी देण्यात आली
दर मंत्रीमंडळ बैठकीत ७५ हजार पदाचा आढावा घेण्यात येणार आहे.
भरती प्रक्रियेला स्वतंत्र्य दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापनेस मंजुरी देण्यात आली
प्रधानमंत्री आवास योजनेत गायरान जमिनीवरील घरं नियमीत करण्याचा निर्णय.
सरसकट वीज तोडणी न करण्याचे मंत्रीमंडळाचे आदेश.
