जळगाव मिरर | ४ सप्टेंबर २०२३
राज्यातील शासन गेल्या काही महिन्यापासून शासन आपल्या दारी या उपक्रमातून गोरगरिबांपर्यंत लाभ पोहोचवण्याचे काम हे सरकार करत आहे. राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या योजना मागील सरकारने बंद पाडल्या. त्या पुन्हा सुरू करण्यात आल्याने आठ लाख हेक्टरवर सिंचनाची व्यवस्था होत आहे. आता लेक लाडकी ही योजना सुरू करत आहोत. या योजनेद्वारे १८ वर्षांची होईपर्यंत मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली.
बुलडाणा येथील कऱ्हाळे लेआऊटजवळील मैदानात शासन आपल्या दारी उपक्रमाचा १५ वा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री म्हणाले, या उपक्रमातूननागरिकांच्या दारापर्यंत जाणारे देशातीलएकमेव राज्य असल्याचाही दावा केला.राज्य शासन जनतेच्या हिताचे निर्णय घेतआहे. गेल्या काळात बंद पडलेल्याअसंख्य योजना नव्याने पुन्हा सुरूकरण्यात आल्या आहेत. ३२ सिंचनप्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आलीआहे. यातून आठ लाख हेक्टर जमीनसिंचनाखाली येणार आहे.
नदीजोड प्रकल्प, दुष्काळग्रस्तांनामदत, महिलांना बस प्रवासात सवलत,७५ हजार पदभरती असे हिताचे निर्णयघेण्यात आले आहे. केंद्र शासनाच्यामदतीने राज्याचा विकास करण्यात येतआहे. महिलांच्या विकासासाठी बचतगटांना चालना देण्यात येत आहे. बचतगटांना स्वस्त व्याजदराची कर्ज सुविधाउपलब्ध करून देण्यासोबतच विपणनाचीसोय उपलब्ध करून देण्यात येणार आहेअसेही मुख्यमंत्री म्हणाले. संचालन क्षिप्रामानकर यांनी केले, तर मेहकरचेउपविभागीय अधिकारी दिनेश गिते यांनीआभार मानले. यावेळी कार्यकर्त्यांचीउपस्थिती होती.