जळगाव मिरर | २९ ऑक्टोबर २०२५
दिवाळी सुरु होण्यापूर्वीच सोन्यासह चांदीचे दर गगनाला भिडले होते आता मात्र दिवाळी सण संपताच सोन्याला चढलेली झळाळी उतरण्यास सुरुवात झाली आहे. चांदीची किंमतही या दरम्यान घटली. गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच घसरण सुरू आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रतितोळा 3500 रुपयांनी कमी झाला. तर चांदी 4 हजार रुपयांनी स्वस्त झाली.
आठवडाभरात सोने प्रतितोळा 12 हजार रुपयांनी, तर चांदी 45 हजार रुपयांनी स्वस्त झाली. मात्र सोन्याचे दर घसरले असले तरी सराफ बाजारात ग्राहकांच्या संख्येतही घट झाली आहे.अशी माहिती जळगाव सुवर्णनगरीतील आर. सी.बाफना ज्वेर्लसचे मालक सुशील बाफना यांनी पुढारीशी बोलताना दिली. मुंबई, नाशिक, जळगाव, पुणेसह राज्यात सराफ बाजारात दिवाळीत सतत दरात चढ-उतार सुरू होते.
सोने 1 लाख 31 हजार रुपये प्रतितोळे भाव होता. त्यामध्ये जीएसटी, घडणावळ नव्हती. तर चांदी 1 लाख 91 हजार रुपये किलोपर्यंत पोहचली होती. सराफ बाजारातील या चढउतारानंतरही दिवाळीत 460 टन, तर एकट्या मुंबईत सर्वाधिक 320 टन सोन्याची विक्री झाली. लक्ष्मीपूजनापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली.
दरारोज चढउतार सुरु असून मंगळवारी सोने 3500 रुपये तर चांदी 4000 रुपयांनी किलोमागे घसरली. यामुळे आठ दिवसात सोने प्रतितोळे 12 हजार, तर चांदी किलोमागे 45 हजार रुपयांनी घसरली. पुणेसह जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये सोने 1 लाख 18,800 हजार रुपये, तर चांदीचा किलोमागे दर 1 लाख 45 हजार रुपये इतका होता.



















