
जळगाव मिरर | ३० नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या अमलीपदार्थाची वाहतूक सुरु असतांना नुकतेच चोपडा तालुक्यातील हातेड, बुधगाव फाट्यावर २९ चोपडा ग्रामीण व डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान दुचाकीवरून १ लाख २० हजारांचा गांजा पकडला आहे. तर ५० हजारांची होंडा कंपनीची एक दुचाकी जप्त केली आहे. यात एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात २९ रोजी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधगाव फाटा येथे ही कारवाई डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकासह चोपडा ग्रामीण पथकाने मिळून केली. या वेळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील निरीक्षक कावेरी कमलाकर, पीएसआय विलास पाटील, राकेश पाटील, प्रमोद बागडे, हितेश बेहरे, गणेश पाटील, रावसाहेब पाटील, विनोद पवार, सुनील कोळी, मनीष गावित, कमलेश बाविस्कर यांनी ही कारवाई केली.