जळगाव मिरर | १८ मे २०२३
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर बांभोरी गावानजीक एका भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकीवरील ४० वर्षीय व्यक्ती जखमी झाला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी महेद्र नन्नवरे (वय ४०) हे दुचाकीने दि १७ रोजी जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अनोळखी चारचाकीने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महेद्र हे जखमी झाले आहे. चारचाकीने धडक दिल्यानंतर तो घटनास्थळाहून फरार झाला आहे. या अपघातात महेद्र नन्नवरे हे जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी फिर्यादी महेद्र नन्नवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. अरुण निकुंभ हे करीत आहे.