
जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२४
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जाणाऱ्या मालवाहू वाहनाने समोरुन येणाऱ्या सतिलाला मधुकर पाटील (वय ४४, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १ रोजी दुपारच्या सुमारास आर. एल. चौफुलीजवळ घडली. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीतील सतिलाला मधुकर पाटील हे दि. १ रोजी दुाचकीने आर. एल. चौफुलीकडून सायली हॉटेलकडे जाण्यासाठी वळण घेतले. यावेळी समोरुन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष येत असलेल्या (एमएच ०४- एचएच ६८६७) क्रमांकाच्या मालवाह वाहनाने त्यांना समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात पाटील हे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले त्यामुळे त्यांचा पाय वाहनाखाली दाबला गेला. आणि डोक्याला देखील मार लागून ते गंभीर जखमी झाले रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सतिलाला पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.