जळगाव मिरर | १५ जुलै २०२३
राज्यात अनेक ठिकाणी गटारी अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जात असते. त्यामुळे भाजपच्यावतीनं आज मुंबईत कोंबडी वाटप होणार असल्याचं पोस्टर प्रचंड व्हायरल झालं आहे. या पोस्टरवर कोकण विकास आघाडीचं नाव आहे. दिप अमावस्या गटारी निमित्त कोंबडी वाटप असा मजकूर या पोस्टरवर आहे.
सोबतच या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा फोटो देखील आहे. भाजपचे पदाधिकारी बबन तोडणकर आणि चेतन देवळेकर यांचं आयोजक म्हणून या पोस्टरवर नाव आहे. सोबतच मुंबई सचिव सचिन विद्याधर शिंदे यांचं नाव देखील या पोस्टरवर आहे. हे पोस्टर प्रचंड व्हायरल झालं आहे. दिप अमावस्या गटारी निमित्त कोंबडी वाटप असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे. आज शनिवारी सायंकाळी 6 वाजता कोंबडी वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. प्रभादेवी नाका (सर्कल), प्रभादेवी इथे हा कार्यक्रम होणार असल्याचं या पोस्टरमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांचे फोटो देखील छापण्यात आले आहेत. यामुळे हे पोस्टर चर्चेचा विषय ठरले आहे.