
जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२६
मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2026 (बॉक्सिंग स्पर्धा) साठी धुळे जिल्ह्यातील अनुभवी पंच मयूर शशिकला लक्ष्मण बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) – ड्रॉ-कमिशनर म्हणून निवड करण्यात आली आहे.
मयूर बोरसे यांनी यापूर्वी राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धा, विविध राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धा तसेच पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट पंच म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या अचूक निरीक्षणशक्ती, नियमांचे सखोल ज्ञान आणि शांत, निष्पक्ष निर्णयक्षमतेमुळे ते राज्यभरातील पंचांमध्ये विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जातात.
विशेष म्हणजे, गेल्या 15 वर्षांपासून ते धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्य पाहत असून या कालावधीत त्यांनी स्पर्धांचे तांत्रिक व्यवस्थापन, पंचांचे मार्गदर्शन, नियमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच स्पर्धा आयोजनामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष डॉ. तुषार रंधे, कार्याध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकर, महासचिव भरतकुमार व्हावळ, तसेच धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष कैलास जैन, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, सामाजिक कार्यकर्ते राहुलआबा रंधे, नगरसेवक रोहितबाबा रंधे, खजिनदार राजेंद्र बोरसे, तसेच डॉ. लिंबाजी प्रताळे, किशोर पाटील, योगेश पाटील KVPS क्रीडा विभाग प्रमुख राकेश बोरसे, बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव,नूर तेली, धीरज पाटील, प्रा. भरत कोळी, ऋषिकेश अहिरे, भूषण पवार आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय स्पर्धेत मयूर बोरसे उत्कृष्ट पंचिंग कामगिरी करत धुळे जिल्ह्याचा गौरव वाढवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.





















