
जळगाव मिरर | ११ जुलै २०२३
जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका संपता-संपत नाही आहे. नुकताच जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एक लग्न यागावाजवळ एका बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एक लग्न या गावाजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास इगतपुरी बस डेपोतील जळगाव शहरातील बस स्थानकावरून इगतपुरी जाणारी बस क्र.एम.एच.४०.एक्यू.६०१० या बसने भरधाव कंटेनरला मागून धडकल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच त्यांच्या खाजगी रुग्णवाहिका घटनास्थळी पाचारण करीत मदतकार्य केले असल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करीत असून अपघातात २ प्रवसी जखमी असल्याचे माहिती समजत आहे.





















