जळगाव मिरर | ४ मार्च २०२४
जळगाव शहरातील दुध फेडरेशन रोड वरील नवीन कानळदा रोड परिसरातील इंद्रप्रस्थ नगर, राधाकृष्ण नगर या परिसरात अनोळखी टवाळखोरांनी तब्बल ७ ते ८ चारचाकी गाड्याच्या काचा फोडत नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन कानळदा रोड परिसरात दि.२ व ३ रोजी रात्री ७ ते ९ वाजेच्या सुमारास राधाकृष्ण नगर व इंद्रप्रस्थ नगरातील तब्बल ७ ते ८ चारचाकी गाड्यांचे काचा फोडत नुकसान केल्याची घटना घडल्याने परिसरातील चारचाकी मालकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी लागलीच शहर पोलिसात धाव घेतली होती. तर घटनास्थळी शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने पाहणी करीत रात्री उशीर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी देखील झाली होती.
या गाड्यांचे झाले नुकसान !
MH.19.CZ.5638 , MH.19.AE.1834, MH.02.BR.4136, MH.01.AX.7721, MH.19.EA.1720 या गाड्यासह आणखी ३ गाड्यांच्या देखील काचा फोडण्यात आल्या आहेत.