जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३ ।
मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बापाने थेट जळगाव कोर्ट परिसरात महिलेचा ड्रेस परिधान करीत संशयित आरोपींना आज न्यायालयात आणणार असल्याची माहिती मिळाल्याने कोर्टात येत संशयित आरोपींना ठार मारण्यासाठी बाप आला होता. पण त्याची एक चूक पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर सर्व सत्य बाहेर आले आहे.
मिळालेली माहित अशी कि, भुसावळ तालुक्यातील नशिराबाद येथे सप्टेंबर मध्ये धम्मप्रिया सुरळकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित आरोपीना आज कोर्टात आणण्यात येणार होते. याची भनक मयत मुलाच्या वडिलांना लागली होती. तोच बदला घेण्यासाठी बापाने एका मुलाच्या मित्रासोबत आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिलेचा ड्रेस परिधान करीत पर्समध्ये गावठी पिस्तुल घेवून सोबत ५ जिवंत काडतूस घेत एका मंदिरावर तो बसला व त्याच ठिकाणी त्याची चूक पोलिसांनी लक्षात घेतली व त्याला ताब्यात घेवून शहर पोलिसात आणले असता त्याने सर्व सत्य सांगण्यास सुरुवात केली.
यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, उमेश भांडारकर, शहर वाहतूक शाखेचे परमेश्वर जाधव यांनी धाडसी कारवाई करत पथकाने या संशयित आरोपी भूसावळातील पंचशील नगरातील रहिवासी मनोहर आत्माराम सुरळकर(वय ५०) याला अटक करीत असतांना झटापटीत एक इसम फरार होण्यात यशस्वी झाला आहे. आपण आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी येथे आलो असल्याची कबुली मनोहरने दिली आहे. शहर पोलिसांच्या पथकामुळे त्याचा डाव उधळून लावण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस निरीक्षक ठाकूरवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात येवून चौकशीला सुरूवात केली आहे.
