• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाळूमाफियांची दादागिरी वाढली : महसुलच्या पथकावर केला प्राणघातक हल्ला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 20, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
वाळूमाफियांची दादागिरी वाढली : महसुलच्या पथकावर केला प्राणघातक हल्ला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२४

धरणगाव तालुक्यातील चांदसर गावाजवळील गिरणा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर १२ ते १५ वाळू माफियांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने चांदसरचे तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळ काढला होता. यात तलाठी पाटील हे गंभीर जखमी झाले असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदसर येथे गिरणा नदीचे पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असून ती रोखण्यासाठी धरणगावच्या तहसीलदारांनी एक पथक तयार केले आहे. याच पथकातील चांदर येथील तलाठी दत्तात्रय शांताराम पाटील व त्यांचे ४ सहकारी वाळूचा उपसा रोखण्यासाठी मध्यरात्री २ वाजता गिरणा नदीत उतरले. याची खबर लागताच या पथकावर वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला. या वेळी तलाठी पाटील यांनी हा हल्ला परतवला असता वाळू भरणाच्या पावड्याने तलाठी पाटील यांच्या पायाच्या पोटरीवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे यावेळी सोबत असलेले सहकारी जीव वाचवण्याच्या हेतूने पळून गेले. यात तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान, १९ डिसेंबरला पहाटे २.१५ धरणगाव येथील तहसील कार्यालयातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने चांदसर बुद्रुक येथील गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडले. ही कारवाई नायब तहसीलदार संदीप मोरे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे, तलाठी दत्तात्रय पाटील यांनी केली. दरम्यान, या कारवाईची माहिती मिळताच दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश ईश्वर कोळी व गावातील इतर १० ते १२ व्यक्ती तसेच ट्रॅक्टर चालक, मालक व वाळू भरणारे मजूर असे एकूण १२ ते १५ जणांनी महसूल पथकावर हल्ला चढवला. अचानक हल्ला झाल्याने महसूलच्या अधिकाऱ्यांसह पथकातील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे धाव घेतली. या वेळी तलाठी पाटील हे हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने त्यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायावर फावडे मारून त्यांचे पायाचे हाड मोडले. त्यांना जळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच दुसऱ्या पथकातील धरणगावचे नायब तहसीलदार संदिप विजयसिंग मोरे, नायब तहसीलदार सातपुते, पाळधीचे स.पो.नि.प्रशांत कंडारे व त्यांचे सहकारी तसेच अन्य ५ तलाठी १५ मिनिटातच नदीपात्रात पोहोचले. तो पर्यंत हल्ला करणारे ट्रॅक्टर घेऊन पळून गेले होते. तर या पथकाला ही गावातील काही लोकांसह महिलांनी अडवले. तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे का, हे तपासून अडवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे हे घटनास्थळी पोहचले.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group