जळगाव मिरर | २२ नोव्हेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यात हिवाळ्याची थंडी वाढत असताना शहरातील एका कॅफेला रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी लागलीच मनपाचे अग्निशमन विभागाचे बंब लागलीच पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळाले आहे.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एम.जे.महाविद्यालय परिसरातील मुख्य चौकातील विठ्ठल मंदिरासमोर एस.जे.इ.पाणीपुरी व कॅफेचे दुकान सचिन सपकाळे यांचे असून दि. २२ रोजी रात्री ९.२० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने मनपाचे अग्निशमन विभागाचे बंबला पाचारण करण्यात आला होते. यावेळी तात्काळ घटना स्थळी अग्निशमन विभागाचे बंब पोहचल्याने आगीवर नियनंतरण मिळविण्यात आले यावेळी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानात असलेले ४ लहान सिलेंडर तर १ मोठे सिलेंडर बाहेर काढण्यात यशस्वी झाले. यावेळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी विक्रांत घोडेस्वार, मोहन भाकरे, देवा सुरवाडे , जगदीश साळूंखे, सरदारसिंग पाटील यांनी घटनास्थळी लागलीच धाव घेतली होती.