जळगाव मिरर | २२ जुलै २०२५
जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील शुभांगी कुणाल नाईक या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती कुणाल रवींद्र नाईक (रा. मेहरुण) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मेहरुण परिसरातील शुभांगी नाईक या विवाहितेने शनिवार दि. १९ जुलै रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारले, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला होता. या प्रकरणात विवाहितेचे वडील राजेंद्र भागवत वाघ यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, शुभांगीचा पती कुणाल याने तिला वारंवार मारहाण करून व शिवीगाळ करून तिचे जगणे कठीण केले व तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या फिर्यादीवरून कुणाल नाईक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि मोहन पाटील करीत आहेत.
