जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२५
भरधाव वाळूच्या डंपरने कारला धडक दिल्याने मायलेकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी डंपर चालक दीपक दगडू ठाकूर (वय २६, रा. डांभुर्णी, ता. यावल) याला अटक करण्यात आले आहे. दरम्यान, जखमी बापलेकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, देवीचे दर्शन करून जळगावकडे येणाऱ्या चौधरी कुटुंबाच्या कारला भरधाव वाळूच्या डंपरने धडक दिली होती. त्यामुळे ही कार विदगाव पुलावरून खाली कोसळून मीनाक्षी नीलेश चौधरी (रा. विठ्ठल नगर) व त्यांचा मुलगा पार्थ नीलेश चौधरी (वय १२) यांचा मृत्यू झाला होता. तर नीलेश प्रभाकर चौधरी (वय ३६) व लहान मुलगा ध्रुव नीलेश चौधरी (वय ४) हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मयत विवाहितेचे वडील पांडुरंग सुकलाल चौधरी (रा. संत निवृत्ती नगर) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून डंपर चालक दीपक ठाकूर याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले. तपासादरम्यान डंपर मालकाचे नाव निष्पन्न केले जाईल, अशी माहिती तपासाधिकारी सपोनि अनंत अहिरे यांनी दिली.