अमळनेर : विक्की उत्तम जाधव
कलाशिक्षकांची वार्षिक आढावा बैठक प्रताप हायस्कूल अमळनेर येथे सम्पन्न झाली .यात कलाध्यापक संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत कंखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकारणीत अध्यक्ष-चंद्रकांत कंखरे (प्रताप हायस्कूल) उपाध्यक्ष-दिनेश गुलाबराव सूर्यवंशी( आदर्श हायस्कूल ,मांडळ) ,उपाध्यक्ष-श्रावण सोनवणे(ढेकु) ,सचिव- दिनेश पालवे (डी. आर कन्या शाळा) ,सह सचिव सूर्यकांत निकम (सार्वजनिक विद्या.सारबेटे)
सदस्य भटेश्वर भदाणे ,दहीवद ,भूषण पाटील-धार ,विजय कापडनिस-रणाईचे ,सीमा शिवदास मोरे-मंगरूळ, सुनीता देवरे-पिळोदे ,भाऊसाहेब पाटील- एन.टी. मुंदडा हायस्कूल , दीपक वाघ-लोढवे यांचा समावेश आहे. या वेळी विशेष प्राविण्य मिळवलेल्या कला शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तसेच नवनियुक्त पदाधिकारीचा सत्कार करण्यात आला.