जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२३
सरत्या वर्षाला दोन दिवस बाकी असून अनेकानी नव्या वर्षात चारचाकी घेण्याचा प्लान बनविला असेल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. नवीन वर्षात अनेक कार लाँच होणार आहे. सेफ्टी, उत्तम फिचर्स आणि नवीन लूक यांसह बाजारात एसयूव्ही लाँच होणार आहेत. या एसयूव्हीची किंमत १५ लाखांपर्यंत आहे. याच कारबद्दल जाणून घेऊया.
ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट ही कार येत्या वर्षात लाँच होणार आहे. ह्युंदाईच्या या कारमध्ये अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहे. १६ जानेवारी २०२४ रोजी ही कार लाँच केली जाईल. या कारमध्ये 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन देखील मिळेल. जे 160 PS आणि 253 Nm टॉर्क जनरेट करेल. याशिवाय कारमध्ये लेवल 2 एडीसचा समावेश केला जाईल.
किया कंपनीने काही आठवड्यांपूर्वी Kia Sonet Facelift चा जागतिक प्रिमियर आयोजित केला होता. या कारची किंमत जानेवारी २०२४ मध्ये जाहीर केली जाणार आहे. या कारची बुकिंग सुरु झाली आहे. ही कार रिटर्निंग डिझेल एमटी वेरियंट वगळाता सर्व प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध होईल. कंपनीच्या इतर कारच्या तुलनेत या कारचे डिझाइन खूप वेगळे असणार आहे. Toyota Urban Cruiser Taisor कार २०२४ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार Maruti Suzuki Fronx बॅज इंजिनीयर्डची नवीन आवृत्ती असेल. या कारमध्ये 1.2L पेट्रोल NA मिल और 1.0L टर्बो पेट्रोल युनिट दिले जाईल. कार मॅन्युअल, स्वयंचलित आणि ट्रान्समिशन पर्यांयासह उपलब्ध आहे.