
जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२५
भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात मध्यरात्रीच्या वेळी विवाहीत महिला झोपलेली असताना गावातीलच एकाने तीचा हात धरीत विनयभंग केला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीसानी गुन्हा दाखल करीत, एकास अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ तालुक्यातील एका गावात मध्यरात्रीच्या वेळी विवाहीत महिला आपल्या घरी झोपलेली असताना गावातीलच राहणारा ललीत नावडे (वय २७) याने सदर विवाहितेचा हात धरून तीच्याशी अंगलगट करण्याचा प्रयत्न केला. तेवढयात शेजारीच झोपलेल्या पतीला जाग येऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या हाताला झटका देऊन तो तरुण तेथून पसार झाला. त्यानंतर सदर घटनेची माहिती वरणगाव पोलीसाना विवाहितीच्या पतीने देताच पोलीस नाईक प्रशांत ठाकुर व पोलीस प्रमोद कंखरे हे त्या गावात जाऊन ललीत नावडे याला राहत्या घरून ताब्यात घेतले.






















