जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२५
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.१६ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जामनेर येथील कुस्ती स्पर्धेचे उदघाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.१६ रोजी दुपारी जळगाव विमानतळावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले तर यावेळी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, खा.स्मिताताई वाघ, आ.राजूमामा भोळे, आ.मंगेश चव्हाण, आ.चंद्रकांत सोनवणे, आ.अमोल पाटील, आ.अमोल जावळे यांच्यासह अधिकारी व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.