जळगाव मिरर | ३ मे २०२४
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना संपूर्ण राज्याचे लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघाकडे असतांना आता शिंदेंची डोकेदुखी वाढणार असल्याची जोरदार चर्चा राज्यात सुरु झाली आहे. कारण याच मतदार संघात आता बिग बॉस फेम अभिनेते अभिजीत बिचुकले हे उमेदवारी करणार आहेत.
कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये ते निवडणूक लढणार आहेत. आज ते आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशामध्ये आता अभिजीत बिचुकले विरूद्ध श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अभिजीत बिचुकले यांनी श्रीकांत शिंदेविरोधात जोरदार निशाणा साधला.
कल्याण लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने दोन वेळा निवडून आलेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला आहे . याच मतदारसंघातून आता बिग बॉस फेम अभिनेते अभिजीत बिचुकले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत . अभिजीत बिचूकले यांनी याआधी सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलाय.