अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील पाडसे या गावात १२ महिन्या पासून गटार काढलेली नाही आहे. पावसामुळे त्या गटारचे पाणी पूर्ण रोडवर शिरत आहे व जवळच ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचा बोर आहे गटारीचे पाणी बोरात जवळ शिरल्याने ते पाणी आता पिण्यायोग्य राहिला नाही व गटारीच्या पाण्यामुळे पूर्ण डास व मच्छर तयार होत आहे. त्यामुळे लहान मुलं व वृद्ध आजारी पडत आहे व येणाऱ्या जाण्यारा लोकांना रस्त्यावर न जावं असं वाटत नाही आहे.गावात पाईप लाईन चे काम झाले आहेत.पण ते व्यस्तीत भुंजले नाही आहे म्हणून त्याचामुळे रोडवर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत.. त्यामुळे त्यांच्यात पाणी साचत आहे.
त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाडी व मोटरसायकल तेथे मोठया प्रमाणात गाडी फसत आहे असे अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंखे शहर उपाध्यक्ष जय राजपूत गणाध्यक्ष अतुल कोळी अतुल राजू सोनवणे वार्ड अध्यक्ष गजानन गोसावी, व मनसे सैनिक संकेत पाटील,आदित्य दोरकर,सिद्धार्थ बिराडे,संकेत कोल्हे आधी उपस्थित होते.