
जळगाव मिरर । ६ जानेवारी २०२३
एका निवृत्त जवानानं एकाच कुटुंबातील 4 जणांवर गोळ्या झाडल्या. यात आई-मुलाचा मृत्यू झाला, तर सून आणि सासरे जखमी असल्याची धक्कादायक हमीरपूर जिल्ह्यातील घडली आहे. सध्या पोलिसांनी आरोपी माजी सैनिकाला अटक केलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हमीरपूर जिल्ह्यातील सुजानपूरच्या बगेहडा गावात घडलीये. शुक्रवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला. यात दोघांना आपला जीव गमवावा लागला असून इतर दोघांना गंभीर अवस्थेत हमीरपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
वास्तविक, ही गोळीबाराची घटना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. जमिनीवरून दोन कुटुंबात वाद होता. गोळीबारात जखमी झालेल्या अजित सिंग (66) यांनी सांगितलं की, माझी पत्नी विमला देवी (59) संध्याकाळी शेतात मिरची तोडत होती. यादरम्यान माझा शेजारी चंचल सिंग तिथं आला आणि त्यानं पत्नीवर गोळीबार केला. यामुळं ती जखमी होऊन खाली पडली.





















