जळगाव : प्रतिनिधी
रावेरकडून जळगावकडे जाणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील दोन प्रवासी जखमी झाले. सुदैवाने उर्वरित १८ प्रवाशांना काहीही दुखापत झाली नाही. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. हा अपघात मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास रावेर शहरापासून तीन कि.मी. अंतरावर डॉ.संदीप पाटील यांच्या शेताजवळ झाला.
जळगाव आगाराची रावेर-जळगाव ही (एमएच ४o एन ९८३४) या क्रमांकाची बस मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता रावेर येथून जळगावकडे रवाना झाली. त्याचवेळी सावद्याकडून येणारा (डीडी ०३ एम ९४३२) या क्रमांकाचा ट्रक कंटेनरने बसला धडक दिली. अपघातानंतर बस शेतात घुसली. यामुळे बसमधील दोन प्रवासी खिडकीच्या तुटलेल्या काचा लागल्याने जखमी झाले. बस अपघाताचे वृत्त कळताच वाहतूक पोलिस भागवत धांडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठवून वाहतूकही सुरळीत केली. याप्रकरणी रावेर पाेलिसांत अपघाताची नाेंद झाली आहे.