जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२४
देशातील अनेक लोक सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले असतांना अनेकांनी पोलिसांची मदत घेतली आहे मात्र काहीना पोलिसांची मदत घेत नाही, पण आता पुण्यात यात सायबर गुन्हेगारीने थेट पोलिसांना देखील चुना लावला आहे. इतकेच नाही तर चोरट्यांनी पोलिसांच्या खिशातील ५ लाखांची रक्कमही लंपास केलीये.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये पोलीस शिपाई वास्तवास असून एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जाहीराती तसेच पोस्ट लाईक करून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. त्यामुळे त्यांना ही स्किम आवडली आणि ते सायबर चोरट्यांच्या जाळ्यात फसले.
त्या पोलीस शिपायांनी काम करायला सुरुवात केली आणि सुरवातीला त्यांना चांगला परतावा देण्यात आला. यानंतर मात्र हा परतावा बंद झाला आणि पोलीस शिपायांना गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले. ऑनलाइन कामात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून सायबर चोरट्यांनी पोलीस शिपायांकडून वेळोवेळी चार लाख ९९ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोबाइल बंद करून ठेवला. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच सापळा रचून आणि सूत्रांच्या माहितीने पुढील तपास सुरू आहे.