
जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२४
भरधाव ट्रकने धडक दिल्याने शहरातील चंदन बाबूलाल बारसे (वय ५८, रा. मारोतीनगर) या या सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना यावल रोडवरील बल्लू गॅरेजसमोर दि. १ डिसेंबर रोजी घडली होती.
याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील वाल्किम नगरात राहणारे सुनील रमेश कडेरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १ रोजी रात्री साडेदहा वाजता चंदन बाबूलाल बारसे हे यावल रस्त्यावरून सायकलीवरून जात असताना भरधाव ट्रक (आर.जे.११ जी.बी. ६६५१) वरील अज्ञात चालकाने धडक दिल्याने बारसे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक पसार झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक जप्त केला असून तपास सहाय्यक निरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.