जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२३
दर्जी फाऊंडेशनतर्फे आय.बी.पी.एस., एस. बी. आय. आणि इतर बँकींग परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. आय.बी.पी.एस. मार्फत क्लर्क आणि प्रोबेशनरी ऑफिसर पदाकरीता लवकरच मोठी भरती जाहीर होणार आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फतही विविध पदांसाठी भरती जाहीर होणार आहे. तसेच पोलीस, सैन्य व स्टाफ सिलेक्शन अंतर्गत हजारो पदांची भरती २०२४च्या सुरूवातीला जाहिर होणार आहे.
त्यासाठी ग्रामिण भागातील युवकांची लेखी व मैदानी तयारी व्हावी या हेतूने निवासी व अनिवासी प्रशिक्षण दर्जी फाऊंडेशन दुसरा मजला, ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड जळगांव येथे आयोजित केले आहे. या सर्व परीक्षांची योग्य पध्दतीने तयारी व्हावी याकरिता दर्जी फाऊंडेशनतर्फे नियमित मार्गदर्शन वर्ग घेतले जाणार आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये २५ वर्षाचा गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचा अनुभव गाठीशी असलेल्या दर्जी फाऊंडेशनकडून बँकींग परीक्षांसाठी देखील मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. यातील तज्ञ मार्गदर्शकांच्या सुयोग्य मार्गदर्शनाने आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांची बँकींग क्षेत्रात निवड झालेली आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची विविध सरकारी बँकांमध्ये निवड होवून त्यांना कायमस्वरूपी शासकीय रोजगार मिळावा म्हणून नियमित मार्गदर्शन वर्ग दि. २५ ऑक्टोंबर पासून नियमित घेतले जाणार आहे. यात आय.बी.पी.एस. आणि एस. बी. आय. तसेच पोलीस, सैन्य व स्टाफ सिलेक्शन परीक्षांसाठी असलेल्या सर्व घटकांचे मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शकांकडून केले जाईल. दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा. गोपाल दर्जी हे स्वतः मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. म्हणून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालिका सौ. ज्योती दर्जी यांनी केले आहे.