• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘व्हॅलेंटाईन डे’ला काळिमा : प्रियकराचा थरार, प्रेयसीचा खून करून घरात पुरला मृतदेह !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 15, 2025
in क्राईम
0
‘व्हॅलेंटाईन डे’ला काळिमा : प्रियकराचा थरार, प्रेयसीचा खून करून घरात पुरला मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२५

प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह शेतातील घरात पुरल्याचा खळबळजनक प्रकार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणातील संशयित प्रियकरास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोनिका सुमित निर्मळ (३०) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख इरफान शेख पाशा (३५) याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील जमुनानगर भागात राहणारी तरुणी मोनिका सुमित निर्मळ ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्मान रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून कार्यरत होती. पतीपासून विभक्त राहणारी मोनिका ही जालना येथे माहेरी आईसोबत राहून रेल्वेने दररोज छत्रपती संभाजीनगरला अपडाऊन करत होती. ६ फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी परत आलीच नाही. तिचा मोबाईलही लागत नव्हता, त्यामुळे चिंतातुर झालेल्या आईने दुसऱ्या दिवशी थेट कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

दोन दिवसांनी मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या नातवाईकांना मी सुखरूप असून मी लग्न केले आहे. आता मी तुम्हाला एक वर्षानंतरच भेटायला येईन, अशा आशयाचा खोटा मेसेज आला. या मोबाईलवरवर फोन केला असता तो पुन्हा लागलाच नाही. त्यामुळे नातेवाईकांच्या मनात शंका निर्माण झाली. नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन याप्रकरणात तत्काळ लक्ष घालण्याची मागणी केली होती. पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी कदीम जालना पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देताच पोलिसांची तपासचक्रे गतीने फिरली.

इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही ६ फेब्रुवारी रोजी रेल्वेने लासूर येथे गेली होती. लासूर येथून जवळच असलेल्या शेतात मोनिकाला घेऊन इरफान गेला होता. शेतात असलेल्या पडीक घरात असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली असून त्यानंतर तिचा मृतदेह त्याच ठिकाणी पुरल्याचे सांगितले होते. दरम्यान, कदीम जालना पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्या समक्ष इरफान याने पुरलेला मोनिका हिचा मृतदेह बाहेर काढला. त्यांनतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. त्याठिकाणी मोनिकाच्या अंगावरील कपडे जाळल्याचेही आढळून आले आहे. दरम्यान, इरफानने मोनिकाने आत्महत्या केल्याचा केलेला बनाव खोटा असून त्यानेच फाशी देऊन नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरून टाकला असावा, असा अंदाज आहे.

असे जुळले प्रेमसंबध !
संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी तिच्याकडे असलेली दुचाकी ती रेल्वे स्थानकावरील वाहनतळावर उभी करत असे. दररोजच्या भेटीमुळे मोनिका आणि वाहनतळावर काम करणारा शेख इरफान शेख पाशा (३५) हे चांगलेच परिचित होते. त्यातून ते एकमेकांशी बोलायचे. दररोजच्या भेटीमुळे या दोघांचे प्रेमसंबंध जुळल्याचा अंदाज आहे.

पोलिसांचे बारकाईने लक्ष !
पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर शेख इरफान शेख पाशा (रा. लासूर स्टेशन) यास ताब्यात घेऊन चार दिवसांपूर्वी जालना येथे आणून चौकशी केली होती. मात्र, त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितल्याने त्याला सोडून दिले होते. आरोपीला सोडून दिले असले तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते. पोलिसांनी इरफानच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्ससोबतच लासूर स्टेशन येथील काही सीसीटीव्ही फुटेज काढून ते तपासले होते. मोनिका हिच्यासोबतचे तासन्तास केलेले मोबाईल संभाषण आणि ६ फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथे फुटेजमध्ये मोनिका व इरफान दिसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे इरफान शेख याच्यावर अधिकच संशय बळावल्याने पोलिसांनी त्यास गुरुवारी पुन्हा ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अखेर तोंड उघडले.

Tags: #murder#policeCrime

Related Posts

आयटीआयसमोर कचरा डेपो : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मनपा आयुक्तांना निवेदन !
क्राईम

आयटीआयसमोर कचरा डेपो : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मनपा आयुक्तांना निवेदन !

November 14, 2025
जळगाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग !
क्राईम

जळगाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग !

November 14, 2025
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची मोठी आघाडी
क्राईम

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची मोठी आघाडी

November 14, 2025
गरम पाणी अंगावर पडले जळगावातील चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

गरम पाणी अंगावर पडले जळगावातील चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू !

November 14, 2025
जळगाव पोलिसांचे पहाटेचे ‘महा-ऑपरेशन’ : १०४ गुन्हेगारांची ‘परेड’, तडीपारीचा इशारा
क्राईम

जळगाव पोलिसांचे पहाटेचे ‘महा-ऑपरेशन’ : १०४ गुन्हेगारांची ‘परेड’, तडीपारीचा इशारा

November 14, 2025
कावडिया प्रकरणात ‘सुसाईड नोट’ चर्चेत : मोबाइल हाती लागताच होणार अनेक खुलासे !
क्राईम

कावडिया प्रकरणात ‘सुसाईड नोट’ चर्चेत : मोबाइल हाती लागताच होणार अनेक खुलासे !

November 13, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात रंगणार बालकलावंतांचा ‘जल्लोष लोककलेचा’ !

जळगावात रंगणार बालकलावंतांचा ‘जल्लोष लोककलेचा’ !

November 14, 2025
आयटीआयसमोर कचरा डेपो : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मनपा आयुक्तांना निवेदन !

आयटीआयसमोर कचरा डेपो : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मनपा आयुक्तांना निवेदन !

November 14, 2025
जळगाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग !

जळगाव एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग !

November 14, 2025
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची मोठी आघाडी

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची मोठी आघाडी

November 14, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group