आज आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजाराला मोठी मंदी लागली आहे. शेअर बाजाराची सुरवात मोठ्या पडझडीने झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. आज बाजारात सुरुवातीला शेअर बाजाराचा निर्देकांक सेन्सेक्स 1,057 अंकांच्या घसरणीसह 57,776 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 310 अंकांच्या घसरणीसह 17,248 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरल्याचे चित्र होते.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
बँक निफ्टीनेही सप्टेंबरच्या मालिकेची सुरुवात 39,130 च्या पातळीवर सकारात्मक नोंदीसह केली. दिवसभर चांगला व्यवहार झाला. बँक निफ्टीने कमकुवत मोमेंटमने व्यवहार केले. व्यापार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 36 अंकांच्या वाढीसह तो 38,987 च्या पातळीवर बंद झाला. बँकिंग इंडेक्सने डेली चार्टवर आणखी एक बियरीश कँडल तयार केली आहे. बँक निफ्टीने गेल्या तीन सत्रांतील हायफॉर्मेशन नाकारले. याने वीकली फ्रेमवर एक बुलिश कँडल तयार केली पण फ्लॅट क्लोजसह हाय वेव प्रकाराचे पॅटर्न बनवले.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
ग्रासिम (GRASIM)
एनटीपीसी (NTPC)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
टायटन (TITAN)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
हिंदुस्थान एअरोनॉटीक्स लिमिटेड (HAL)
ट्रेंट (TRENT)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
व्होल्टास (VOLTAS)