
जळगाव मिरर । २८ ऑक्टोबर २०२२
भडगाव येथील श्री दत्त संस्थान उर्फ अवधूत मठी येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु भक्त भिका गंगाराम पाटील यांच्या हस्ते दीपोत्सवाचे दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी संस्थांच्या प पू लतामाई अवधूत दातार, भडगाव चे माजी नगरसेवक विजयकुमार देशमुख , डॉ इश्र्वरसिंग परदेशी, पत्रकार विजयकुमार देशपांडे ,डॉ दिपक मराठे डॉ दुर्गेश रुले, आदी सह भक्तमंडळी उपस्थित होते. गेल्या चौदा वर्षापासून दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवासाठी जळगाव सह इतर जिल्ह्यातूनही भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यंदा देखील या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थांचे अध्यक्ष मिलिंद दातार यांचे नुकतेच निधन झाले होते त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यंदाही या दीपोत्सवात सहभागी झाले होते . दर वर्षी दिपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येते. परंतु यंदाचा मान गुरु भक्त भिका पाटील यांनी दीपोत्सवाचे दीपप्रज्वलन केले.दरवर्षी भक्तांना मधून एकाची निवड करून त्यांच्या हस्ते दीप उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले . तसेच भक्त मंडळींनी मंदिराच्या गभाऱ्यासह सभामंडप, मंदिराच्या आवारात 5 हजार दिवे लावण्यात आले. त्यामुळे दिव्यांचा झगमगाट दिसणारे नयनरम्य दृष्य अनेकांना मोबाईल टिपण्याचा मोह आवरला नाही.




















