नागपूर : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व त्यांच्यासोबत असलेले उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार हे नागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासात सुदैवाने बचावले आहेत. या घटनेनंतर अजित पवार यांनी प्रवासातला त्यांचा अनुभव सांगत माझ्या तर पोटात गोळा उठला होता. पण पांडुरंगाच्या कृपेने आम्ही सर्व सुखरुप खाली उतरलो.
खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये भरकटले होते. खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. हेलिकॉप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवले. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. काही काळ हेलिकॉप्टर भरकटल्याने आत बसलेल्या नेत्यांचा जीव मात्र टांगलीला लागलाला होता.
गडचिरोलीत या सर्व नेत्यांना खराब हवामानाचा फटका बसला होता. पण, सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत. हेलिकॉप्टर पायलटने यावेळी आपलं कौशल्य दाखवल्याचं सांगितलं जातं. त्याने सुखरूप हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवले.
तुम्हाला कल्पना नाही, भविष्यात किती मोठे बदल या भागात होतील. जेव्हा आम्ही येत होतो, खूप ढग होते. नागपूरातून उड्डाण केले तेव्हा बरे वाटत होते, मात्र गडचिरोलीजवळ आलो, हेलिकॉप्टर ढगात शिरले, तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. मी इकडे तिकडे पाहत होतो.. सर्व घाबरून होतो, मात्र देवेंद्र फडणवीस निवांत होते. त्यांना म्हणालो पहा आपण ढगात जात आहोत. तेव्हा फडणवीस म्हणाले घाबरु नका माझे आजवर सहा अपघात झालेले आहेत. मला मात्र कधीही काही झाले नाही. मी हेलिकॉप्टरला असलो तर कधी ही काही होत नाही. आणि तसेच झाले आम्ही सुखरूप लँड झालो, असा किस्सा त्यांनी सांगितला अन् गडचिरोलीत सभेत एकच हशा पिकला.