चाळीसगाव : कल्पेश महाले
धकाधकीच्या जीवनात मनशांती मिळण्यासाठी परिसरातील आध्यात्मिक केंद्रांचा विकास होणे गरजेचे असून याच हेतूने रेणुका माता मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला शहरातील भाविक भक्तांना या आध्यात्मिक केंद्राचा अधिकाधिक लाभ घेता यावा म्हणून सभामंडपाची उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज येथे केले. चाळीसगाव येथील नेताजी पालकर चौकातील रेणुका माता मंदिराच्या परिसरात पर्यटन निधीतून सभा मंडपाचे भूमिपूजन खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
सुरुवातीला संबळ वादनाच्या दणदणाटात खासदार उन्मेशदादा पाटील यांच्यासह कार्यकर्ते महिला भाविक यांच्याहस्ते रेणुका मातेची आरती करण्यात आली. यानंतर कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डी एस मराठे तसेच प्रमुख अतिथी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संचालक प्रमोद पाटील, नगरसेवक सुरेश स्वार, नगरसेवक राजूआण्णा चौधरी, एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर,माजी नगरसेवक महेंद्रसिंग पाटील, निलेश राजपूत, नगरसेवक बापू अहिरे, क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष हभप अभिमान पाटील, मराठा समाज सचिव ह.भ.प बंडू पगार,नगरसेविका संगीता गवळी, पंचायत पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील,सेवानिवृत्त डी वाय एस पी शांताराम गायकवाड, समाजाचे अध्यक्ष रामभाऊ गायकवाड, उपाध्यक्ष संतोष सोनवणे, सचिव जयंतराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ चौधरी, नगरसेवक शेखर देशमुख, सचिव केशवराव साळुंखे, नारायण जाधव, ह भ प तुकाराम चौधरी, सेवानिवृत्त अधिक्षक भिकनराव गायकवाड, स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य राकेश कोतकर उपस्थीत होते.
याप्रसंगी रा.वी.संचालक प्रमोद पाटील म्हणाले की खासदार उन्मेशदादा पाटील यांचा विकासाचा झंझावात कौतुकास्पद आहे. आज त्यांच्या प्रयत्नातून सभामंडप मंजुर केल्याने भाविकांसह आम्हाला सर्वांना आनंद आहे. माजी सभापती संजय पाटील यावेळी म्हणाले की खासदार उन्मेशदादा पाटील यांनी चाळीसगावकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असो वा ट्रॉमा केअर सेंटर अशी अनेक लोकाभिमुख कामे केलीत. तालुक्यातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आमदारकीच्या काळात सातत्याने पाठपुरावा केला.आज गोंधळी समाजाच्या कुलदेवतेच्या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याने हा छोटासा समाज आनंदी झाला आहे.
यावेळी नगरसेविका संगीता गवळी यांनी प्रास्ताविकातून भाविकांच्या वतीने खासदार महोदयांचे आभार मानले. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, प्रभाकर उगले,राजेंद्र साळुंखे, गणेश सोनवणे ,दादा गरुडकर, मुकेश पवार, कचरेश्वर सोनवणे ,शेखर सोनवणे,राजेंद्र उगले, हनुमान चव्हाण, हरिष गरुडकर ,सतीश पवार, तोताराम सोनवणे , विठ्ठल धुमाळ ,जगन्नाथ बडगे, केशवराव साळुंखे, सर्वेश पिंगळे, रवीआबा राजपूत, सौरव पाटील, कल्पेश मालपुरे, अमित सुराणा, कल्पेश महाले, मयूर साळुंखे सुनील रणदिवे,अनिल चव्हाण, संजय चौधरी सरपंच भाऊसाहेब सोनवणे वसंतराव गायकवाड परशुराम महाले,राजेंद्र गवळी, डॉ.सुभाष निकुंभ, जगदीश महाजन,स्वप्नील मोरे, मुकेश गोसावी, अग्गाभाई शेख यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन तर आभार सचिव जयंत गायकवाड यांनी मानले.