जळगाव मिरर | १६ नोव्हेंबर २०२५
प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव शहर युवक अध्यक्षपदी धनंजय दिलीप चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शहरातील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच आघाडी घेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील रहिवासी धनंजय चौधरी यांच्या निवडीचे समाजात स्वागत करण्यात येत आहे.
नुकत्याच नंदुरबार येथे झालेल्या महासंघाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. विजय चौधरी यांच्या हस्ते धनंजय चौधरी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास नाशिक विभागीय युवक अध्यक्ष प्रशांत सुरळकर, कार्याध्यक्ष विनोद चौधरी, उमेश चौधरी, चेतन चौधरी, स्वप्निल चौधरी, प्रदीप चौधरी, महिला महानगराध्यक्षा मनिषा चौधरी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. धनंजय चौधरी यांच्या या निवडीमुळे समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



















