जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२३
गेल्या काही वर्षापासून दिशा सालियन मृत्यूप्रकरण जोरदार चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते आ.आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चर्चा सुरु झाली असून नुकतेच दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आता अखेर SIT स्थापन केली जाणार आहे. मुंबई पोलिसांना राज्य सरकारकडून याबाबत लेखी आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना SIT स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान प्रकरणी चौकशीची मागणी सतत्याने केली जात होती. त्यामुळे आता या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्याता आहे.आदित्य ठाकरे यांची चौकशीची मागणी सातत्याने केली जात असतानाच, आता एसआयटी करण्याचे आदेश दिल्याने आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी वर्षभरापूर्वी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT करण्याचे आदेश दिले होते. तर दुसरीकडे दिशाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या चौकशीला विरोध केला होता. कुटुंबीयांचे म्हणणे होत की, दिशाच्या मृत्यूची आधीच कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एसआयटी लावून आमची मुलगी परत येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करत दिशाच्या कुटुंबीयांनी एसआयटी चौकशीसाठी विरोध केला होता.