जळगाव मिरर | १० मार्च २०२४
दिव्यांग व्यक्तींना रोटरीतर्फे मोफत मिळणाऱ्या कृत्रिम पायामुळे नव्याने जगण्याचं बळ मिळेल असा विश्वास रोटरी डिस्ट्रिक्ट 3030चे माजी प्रांतपाल डॉ.आनंद झुनझुनवाला यांनी व्यक्त केला . येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आयोजित शिबिरात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी १६७ दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम पायांचे वितरण करण्यात आले.
मायादेवी नगर येथील रोटरी भवनात झालेल्या कार्यक्रमाचे प्रसंगी व्यासपीठावर डीजीएनडी डॉ.राजेश पाटील, रोटरी जळगाव वेस्टचे अध्यक्ष सरिता खाचणे, मानद सचिव मुनिरा तरवारी, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, सहप्रमुख सुनील सुखवानी, डॉ.प्रीती भारुडे, रोटरी न्यू कल्याणचे अध्यक्ष कैलास देशपांडे, नामदेव चौधरी, पंकज झांबरे, लिग्रंड कंपनीचे समीर दाभोळकर, सतीश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रकल्पासाठी दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील व शेजारील मध्य प्रदेश राज्यातील लहान बालक, महिला व पुरुष दिव्यांग व्यक्तींचा यात लाभार्थी म्हणून समावेश होता. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख योगेश भोळे यांनी केले. आभार मूनिरा तरवारी यांनी मानले.
यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या फिजिओथेरपी डॉ. वैष्णवी चौधरी, डॉ. ओंकार छाब्रा, डॉ.खुशबू कथारिया, डॉ. दुर्गेश जयस्वाल, रोटरी जळगाव वेस्ट, रोटरी न्यू कल्याण या क्लबच्या पदाधिकारी व मान्यवरांसह रोटरी क्लब चोपड्याचे अध्यक्ष चेतन टाटिया, डॉ. ललित चौधरी व त्यांचे सहकारी, रोटरी चाळीसगाव रॉयलचे हर्षद ढाके व त्यांचे सहकारी, रोटरक्ट जळगाव वेस्टचे अध्यक्ष प्रतीक वाणी व त्यांचे सहकारी आणि तंत्रज्ञांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.