जळगाव मिरर | ११ नोव्हेंबर २०२४
शहरातील पिंप्राळा हुडको परिसर येथे काल सायंकाळी 7 वाजता वंचीत आघाडी व पिंप्राळा हुडको वासियांमार्फत कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या नागरिकांनी ‘ ललित भाऊ तुम्ही चिंता करू नका सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे!. असा विश्वास देत सत्कार केला. यावेळी ललित घोगले यांनीं सर्वांचे मनापासून आभार मानले. वंचित आघाडीचे उमेदवार इंजि. ललित घोगले यांना शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी स्वागत, महिलांकडून औक्षण केले जातं असून, जेष्ठाकडून देखील आशीर्वाद मिळत आहेत. त्यामुळे वंचीत आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून, सगळेच जण जोमाणे कामाला लागले आहेत.
बैठकीस यांची होती उपस्थिती.
वंचीत आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रविकांत वाघ, राष्ट्रीय प्रबोधनकार माईसाहेबराजे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, दिगंबर सोनवणे, राहुल सुरवाडे, गोकुळ सोनवणे, सागर केदार, अंकित मौर्य, अतुल पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.