जळगाव मिरर / २६ फेब्रुवारी २०२३
शहरातील महामार्गावर काही ठिकाणी दुरूस्तीचे काम सुरू असून अशात आयएमआर महाविद्यालयाजवळ रात्री दुरूस्त केलेल्या रस्त्यावरुन वाहने जाऊ नये म्हणून कडेला दगड ठेवले होते. याच दगडाजवळुन जात असताना उच्च शिक्षीत, जीम ट्रेनर तरुणीच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने कट मारला. यामुळे तरुणी थेट दुभाजकावर आदळली. गंभीर जखमी असलेल्या या तरुणीचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. पुनम सुनिल विसपूते (वय २७) असे मृत तरुणीचे नाव आहे.
२१ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता पुनम विसपुते शहरातील एका खासगी जीममध्ये ट्रेनर, सेल्स मॅनेजर म्हणून काम करीत होती. २१ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ती ड्युटीवर जात असताना आयएमआर महाविद्यालयाजवळ महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहुन पुढे जात असताना हा अपघात झाला. महामार्ग प्राधिकरणाने आयाताकृती भागाची रात्री दुरूस्ती केली होती. तो भाग ओल्या डांबराचा असल्यामुळे त्यावरुन इतर वाहने जाऊ नयेत म्हणून त्यांनी थेट रस्त्यावर दगड ठेऊले होते. पुनम या दगडांजवळुन जाण्यासाठी रस्त्याच्या मधोमध अाल्याने मागुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने तीला कट मारला. यामुले तोल गल्याने पुनम थेट दुभाजकावर आदळली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. सुदैवाने काही मिनीटातच तीचा सहकारी लोकेश बारसे हा मागुन येत असताना त्याने जखमी अवस्थेतील पुनमला बघितले. रिक्षेतून खासगी रुग्णालयात दाखल केले. पाच दिवसात वेगवेगळ्या तीन रुग्णालयांमध्ये पुनमवर उपचार सुरू होते. अखेर रविवारी पहाटे तीचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटंुबीय, नातेवाईकांना जबर धक्का बसला. रविवारी दुपारी तीच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुनमच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.
