जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२५
यावल तालुक्यातील न्हावी येथील कुंभारवाडा येथील रहिवासी पार्वताबाई मधुकर कापडे (वय ६५) शनिवार दि.२२ रोजी झाला. त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू असतांना त्यांचा लहान मुलगा विलास (वय ४०) यांची देखील प्राणज्योत मालावली. एकाच कुटुंबातील आईसह मुलाची अंत्ययात्रा सोबत निघाल्याने न्हावी येथे समाजमन हळहळले.
सविस्तर वृत्त असे कि, पार्वताबाई कापडे यांना दोन मुले, एक मुलगी, दोघं मुलांचे लग्न होऊन मुलगीचेही लग्न झाले आहे. घरामध्ये सुनबाई नातवंडे असा गजबजलेला परिवार आहे. पार्वताबाई कापडे या आजारी होत्या शनिवार दि २२ रोजी दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता त्यांच्या सर्व नातेवाईकांना कळविण्यात आली. अंत्यविधीचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजेला ठरला त्यांच्या अंत्यविधीसाठी सर्व नातेवाईक व गावातील नागरिक जमा झाले.
संध्याकाळी त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्यांचा लहान मुलगा विलास (वय ४०) यांची सुद्धा प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. आई व मुलाच्या एकाच दिवशी झालेल्या मृत्यूने नातेवाईक व त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकाच दिवशी आई व मुलांच्या अंत्ययात्रेने गावातील समाजमन हळहळले. संध्याकाळी येथील स्मशानभूमीत आईला मोठा मुलगा कैलास याने अग्नीडाग दिला. तर मुलाला त्याच्या बारा वर्षाच्या मुलाने अग्नीडाग डाग दिला. एकाच वेळी आई व मुलाची चिता पाहून अंत्ययात्रेतील उपस्थितांची डोळे पाणावले.