जळगाव मिरर | ४ सप्टेबर २०२४
शहरातील खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगांव च्या राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे आज दि.३ सप्टेंबर २४ रोजी महाविद्यालय परिसरात “एक पेड मां के नाम” या मोहिमेत वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकरी संतोष बडगुजर यांनी मानवी जीवनातील वृक्ष लागवत आणि संवर्धन किती आवश्यक आहे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना अन्न साखळीतील जीव श्रुष्ठी साठी वृक्षाचे महत्व विषद केले प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांनी वृक्षारोपण केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी श्री. दिनेश ठाकरे महिला कार्यक्रम अधिकार डॉ. वैजयंती चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी, प्रा. हितेंद्र सरोदे, प्रा. संजय बोंडे,प्रा लक्ष्मी गाजरे इतर शिक्षेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक, स्वयंसेविका उपस्थित होते.