जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२४
भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावातील एका वृध्दाला चोरीचा संशय घेत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी बुधवारीभुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुकयातील निंभोरा येथील रशिद गुलजार पिंजारी (वय ६१) हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता संशयित विनोद चंदू सोनवणे आणि रूपेश चंदु सोनवणे दोन्ही रा. जाडगाव यांनी रशिद पिंजारी यांच्यावर रिक्षाचे टायर चोरी केल्याचा आरोप करत त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर रशिद पिंजारी यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री चौधरी हे करीत आहे.