जळगाव मिरर | ४ जून २०२५
शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने वृद्ध शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ३ रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील भाईदास उत्तम गव्हाणे (वय ६५) हे ३ जून रोजी सकाळी शेतात गेले होते. त्यांचा पुतण्या अरुण गव्हाणे याला १०.३० वाजता ते शेतातील विहिरीजवळ उभे असल्याचे दिसले. मात्र, पाच मिनिटांनी ते न दिसल्याने त्यांचा पुतण्याला शंका आली. त्यामुळे त्याने विहिरीत उडी मारून पाहिले, मात्र पाणी खोल असल्याने भाईदास गव्हाणे हे दिसले नाहीत. त्यानंतर अरुण गव्हाणे याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवून पाण्याचा पंप सुरु करून पाणी उपसले. त्यावेळी भाईदास गव्हाणे हे दिसले. त्यानंतर त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले
