
जळगाव : प्रतिनिधी
रेल्वेच्या धडकेत सुरेश धर्मा पाटील (वय ७३, रा. अजिंठा हौसिंग सोसायटी) यांचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव ते शिरसोली दरम्यान घडली. बुधवारी वृद्धाच्या नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ते शिरसोली रेल्वे रूळावरील रेल्वे खंबा क्रमांक ४१५ जवळ एका मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारा छापरा एक्सप्रेस समोर सुरेश पाटील हे आल्याने त्यांचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला होता. लोको पायलट एस.एस.निंबाळकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातीला अनोळखी म्हणून जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला होता. मयत हे सुरेश पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास पोउनि शामकुमार मोरे हे करीत आहे.




















