
जळगाव मिरर | ७ जुलै २०२४
देशातील जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दि.६ जुलै रविवारी रोजी सलग दुसऱ्या दिवशी चकमक सुरूच आहे. मुदरघम आणि चिनिगम फ्रिसालमध्ये आतापर्यंत 5 दहशतवादी मारले गेले आहेत. दोन जवान शहीद झाले आहेत. मुदरघममध्ये दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची आणि चिनीगाम फ्रिसलमध्ये आणखी एक दहशतवादी लपल्याची शक्यता आहे.
दोन्ही ठिकाणी कारवाई सुरू आहे. आज सकाळी मुदरघममध्ये एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. येथे शनिवारी (6 जुलै) दुपारी दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद झाला. कुलगामच्या चिनिगाम फ्रिसलमध्ये काल चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. एक जवान शहीद झाला आहे. दुसरीकडे, रविवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला. जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी घनदाट जंगलातून पळून गेले. लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. आज डोडा येथे जम्मू-काश्मीरचे डीजीपी आर. स्वेन यांनी डोडा जिल्ह्यातील गंडोह भागात 3 दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या एसपीओचा नियुक्ती पत्र देऊन सन्मान केला. स्वेन म्हणाले की जेव्हा एसपीओसह पोलिस कर्मचारी जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी असे काम करतात, तेव्हा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्यांना कॉन्स्टेबल म्हणून भरती करतो.






















