जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२५
राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॅाक्टर महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या घटनेचा तीव्र निषेध राज्यभरातून नोंदविण्यात येत आहे. महिलेने तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख होता. यामधील आता आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी प्रशांत बनकर या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेनंतर पोलिसांची पथके दोन आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती. युवतीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याने मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. आज पहाटे चार वाजता प्रशांत बनकरला पोलिसांनी अटक केली आहे. तो मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता, सातापा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
डॉक्टर महिलेने मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहीली होती. PSI गोपाळ बदने याने आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचे तिने नोटमध्ये लिहीले होते. तर प्रशांत बनकर याने आपला मानसिक व शारीरीक छळ केल्याचा आरोप करत तरूणीने आयुष्य संपवले.





















