
जळगाव मिरर | १८ जुलै २०२३
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या कामांची ३०० ते ३५० कोटी रुपयांची बिले अडकून पडल्याने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेल्या मक्तेदारांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसीय साखळी उपोषण व निषेध आंदोलन सुरू केले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी भेटी देणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी देखील भेट देत त्यांच्या समस्याचा पाढा समजून घेत आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ जळगाव शाखा, जळगाव जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, जळगाव शाखा यांच्या नेतृत्वात सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे आज दुसऱ्या दिवशी जळगाव मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांचा प्रश्न समजून घेवून याबाबत ना.गिरीश महाजन यांच्याशी भेट घेवून याबाबत त्यांच्याकडे हा विषय मांडून लवकरात लवकर विषय मार्गी लावू असे आश्वासन देखील डॉ.अश्विन सोनवणे यांनी उपोषणकर्त्यांना दिले आहे. यावेळी उपोषणस्थळी शामकांत सोनवणे, राहुल सोनवणे, नगरसेवक धीरज सोनवणे, प्रमोद नेमाडे, सुनील पाटील, सुधाकर कोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.





















