जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून जोरदार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान देखील होत आहे तर नुकतेच चोपडा तालुक्यात माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची ही तीन मजली जुनी ईमारत दिनांक ५ च्या रात्री सुमारे २ ते ३ वाजेच्या सुमारास कोसळली. ही ईमारत सुमारे ७० ते ८० वर्ष जुनी असून त्याठिकाणी सद्ध्या तरी कोणाचेही वास्तव्य नव्हते. अरूणभाई गुजराथी हे त्यांच्या कुटुंबियांसह नव्या इमारतीमध्ये मागील बाजूला राहत असून कोणालाही कोणतीच हानी पोहोचली नाही. सर्वच कुटुंबीय सुखरूप असल्याचे कळते.
गुजराथी गल्लीतील महादेवाच्या मंदिरासमोर ही तीन मजली जुनी ईमारत असून यातील काही भाग रात्री पावसाने जमीनदोस्त झाला आहे. दिवसा जर ही घटना घडली असती तर काल श्रावण सोमवार होता. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात अनेक लोक दर्शनासाठी येत जात होते. जी ईमारत रात्री कोसळली त्याठिकाणी जुना ओटा होता व त्याठिकाणी बरेच लोक निवांत बसत होते. पण ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळपासून सदरील घटना बघायला नागरिकांनी मोठी गर्दी केली.