
जळगाव मिरर | २८ जुलै २०२३
राज्यात नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित असल्या बाबत आ. एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला यावेळी ते म्हणाले राज्यात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेच्या लाभ महाराष्ट्रातील अल्प व मध्यम शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने देण्यात येत असून नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांच्या लागवडीवर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करते, तसेच महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांतील ५१४२ गावांमध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना राबविण्यात आली असून मागिल दोन महिन्यांपासून योजनेचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना सदर योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत असल्याने त्याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे,
सदर योजनेची व्याप्ती वाढवून उर्वरित गावे व लहान नगर पंचायत क्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, असे असल्यास, सदर गावांची निवड करताना कोणते निकष लावण्यात येणार आहेत व शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता शासनाकडून कोणती कार्यवाही केली करण्यात येत आहे, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सदर प्रश्नाला उत्तर दिले यावेळी ते म्हणाले मागिल दोन महिन्यांपासून नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना (पोकरा) योजनेचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना सदर योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत असल्याने त्याबाबत शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन प्राप्त झाले आहे. निवेदन प्राप्त झाले आहे. शासन निर्णय दिनांक ३० जून २०२३ अन्वये जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत समाविष्ट असलेल्या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजीत रुपये ६००० कोटी किंमतीच्या जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यास शासनाची तत्वत: मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पाचा टप्पा-२ च्या आखणीचे काम आणि गांव निवडीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने निकष ठरवून त्याआधारे गावांची निवड करण्यासाठी अपर मुख्य सचिव, कृषि यांच्या अध्यक्षतेखाली गांव निवड समिती स्थापना करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.





















