जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२४
राज्यात गेल्या काही दिवसापासून नागपूर शहरात पाणी तुंबल्याने चर्चेत असतांना आता नुकतेच नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात एका कंपनीमध्ये पहाटे तीनच्या सुमारास स्फोट झाला अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून 6 ते 7 जण जखमी झाले आहेत. बॉयलरच्या कॅप्सुलमध्ये ब्लास्ट झाल्याने एका मजुराचा मृत्यू तर अन्य 6 ते 7 मजूर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौदा तालुक्यातील झुल्लर गावात सिमेंट ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला. त्यामुळे कारखान्यासाठीचे टिन शेड खाली कोसळले आहे.यात कंपनीतील नंदकिशोर करंडे यांचा मृत्यू झाला आहे. नंदकिशोर क्रेन ऑपरेटरचे काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे. तर जखमीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर 3 ते 4 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट नेमका कसा झाला याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. जखमींना नागपूरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आहे.