
जळगाव मिरर | ८ जुलै २०२३
जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज असलेले व्यक्तीमत्व डॉ.प्रताप जाधव यांचे दि.७ रोजीच्या मध्यराती उशीरा उपचार सुरू असतांना निधन झाले. डॉ.प्रताप जाधव हे दुर्धर आजाराने ग्रासले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार घेत असतांना रात्री अकराच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शहरातील भास्कर मार्केटमध्ये मालती ऍक्टीडेंट हॉस्पीटलच्या माध्यमातून त्यांनी रूग्णांची सेवा केली. जिल्ह्यातील नामवंत अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून डॉक्टर जाधव हे होते. यासोबत डॉ. प्रताप जाधव यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान देखील तितकेच महत्वाचे होते. केशवस्मृती प्रतिष्ठानच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.





















