जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२३
राज्यभरात आज ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही भागात पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी केलेल्या पिकांना गारांचा आणि पावसाचा मोठा फटका आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने पुण्यासह नाशिक, अहमदनदर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच आज विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्याच्या काही भागांमध्ये आजही पावसाचीही शक्यता आहे. वादळी वारे आणि गारपिटीसह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे फळबांगानांही मोठा फटका बसला असून, पुढील काही तासांसाठी राज्यात वादळाचे इशारे देण्यात आले आहेत. राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे.